ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओवळीये येथील भगवान वरक यांचे अकस्मात निधन.

ओवळीये येथील भगवान वरक यांचे अकस्मात निधन.

प्रकाशन: 16 Aug 2023 08:35 PM
वाचन संख्या 99

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ओवळीये धनगरवाडी येथील भगवान वाघू वरक (४२) यांचे आज बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. भगवान वरक यांना सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी सुरुवातीला सावंतवाडीत त्यानंतर अधिक उपचारासाठी कुडाळ येथे नेत असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. भगवान वरक यांच्या आकस्मित निधनाचा वरक कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ओवळीये गावावर शोककळा पसरली.

आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, दोन भाऊ, बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे. आरोस -कोंडुरा हायस्कूलचे शिक्षक तानाजी वरक तसेच पाडलोस प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल वरक यांचे ते बंधू होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स