ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन सज्ज ; तहसीलदार दिप्ती देसाई यांनी डोंगराळ भागात जाऊन केली विशेष पहाणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन सज्ज ; तहसीलदार दिप्ती देसाई यांनी डोंगराळ भागात जाऊन केली विशेष पहाणी.

प्रकाशन: 21 Jul 2023 11:00 AM
वाचन संख्या 309

नवलराज काळे | सहसंपादक : सद्य स्थितीतील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडी येथे जाऊन डोंगर भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सूचना केल्या. रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी परिसरातील डोंगराचा भाग घरांवर कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. खबरदारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सौ. देसाई यांनी तालुक्यातील अनेक गावात जाऊन धोकादायक ठिकाणांची पहाणी केली.

करूळ भट्टीवाडीतील ग्रामस्थांशी तहसीलदार देसाई यांनी संवाद साधला. डोंगरा पासून वस्ती जवळ आहे. त्यामुळे डोंगराला कुठे भेगा गेल्या असतील, किंवा भूस्खलन होत असेल तर तात्काळ आपत्ती प्रशासनाला त्याची माहिती द्या. असे तहसीलदार देसाई यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी नायब तहसीलदार श्री पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, विवेक कदम, सह्याद्री जीव रक्षक चे हेमंत पाटील, प्रकाश सावंत, राजेंद्र कदम, विजय सावंत, राजेंद्र वारंग, तलाठी सुदर्शन पाटील, कोतवाल रत्नकांत राशीवटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम कदम, दौलत जिनगरे, नारायण कदम, अनिल जिनगरे, श्रीधर मोरे, पांडुरंग केगडे, सुरेश जिनगरे, जगन्नाथ चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डोंगर भागाची व घरांची तहसीलदार यांनी पाहणी केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स