ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे (चांदेरवाडी) गांवचे उद्योजक सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना कोकण आयडाॅल पुरस्कार प्रदान ; मुंबईत संपन्न झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवर होते उपस्थित.

मसुरे (चांदेरवाडी) गांवचे उद्योजक सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना कोकण आयडाॅल पुरस्कार प्रदान ; मुंबईत संपन्न झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवर होते उपस्थित.

प्रकाशन: 19 Jul 2023 01:27 PM
वाचन संख्या 282

मसुरे | प्रतिनिधी : ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लब च्या वतीने देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान २०२३ पुरस्कार मसुरे चांदेरवाडी चे सुपुत्र आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. १६ जुलैला प्राचार्य बी एन वैद्य सभागृह दादर मुंबई येथे कोकण व्हिजन परिषदेत ग्लोबल कोकण व कोकण क्लबचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे सयोजक श्री संजय यादवराव, छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी भोसले छत्रपती,
मा. श्री. रघुजीराजे आंग्रे( छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे वंशज), तसेच मा. श्री. कुणालजी टिळक ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांचे वंशज ) डॉ अनिल देशपांडे,राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. द म सुखथनकर, डॉ संजयजी भावे (कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली)
व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना हा कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉक्टर दीपक परब यांच्या आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक उद्योग, कला, क्रीडा, कृषी, पर्यटन आदी क्षेत्रात लोकाभिमुख भरीव अशा कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डॉ. दीपक परब हे श्री स्वामी समर्थ येयर फ्राईट प्रायव्हेट लिमिटेड, कोकण ऍग्रो प्रा. लि. या कंपनीचे संचालक असून उद्योग क्षेत्रात मुंबई तसेच सिंधुदुर्ग मध्ये त्यांचे मोठे नाव आहे. गोर गरीब जनतेला त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे ते अध्यक्ष असून या क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. विविध ठिकाणी अनेक क्रीडा स्पर्धा भरवून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही मोठा नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक क्षेत्रात अनेक गरीब गरजू रुग्ण, गरीब विद्यार्थी, निराधार माता, वृद्ध, दीन दुबळ्या भगिनी यांना वेळोवेळी आर्थिक मदत करून त्या सर्वांना खंबीर असे पाठबळ दिले आहे. गांवातील धार्मिक क्षेत्रातही त्यांचे वेळोवेळी मोठे योगदान असते.

पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी विविध देशांचे भेटीगाठी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा सहित महाराष्ट्रामध्ये पर्यटनातून रोजगाराची संधी निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी विविध देशांच्या पंतप्रधान महोदयांच्याही गाठीभेटी घेऊन पर्यटना साठी चालना दिलेली आहे. तसेच कृषी क्षेत्रामध्ये ही त्यांनी आधुनिक शेती द्वारे रोजगाराची संधी जिल्हा वासियांना उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी त्यांना विविध क्षेत्रातील तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराज्य असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.आज विविध संघटनांची विविध शेत्रातील अध्यक्षपद डॉक्टर दीपक परब हे भूषवित आहेत. विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठे योगदान दिले आहे.

डॉक्टर दीपक परब यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार मिळाल्या मुळे मसुरे, मालवण सहित मुंबई मध्ये अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांची प्रशंसा केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स