डिकवल कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा झाला शुभारंभ.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढिवसानिमित्त त्यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या डिकवल तळ्याचे भरड ते मधली वाडी रस्त्यावर कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ गोळवण गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी ग्रा.पं. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्री. संजय पाताडे, इंजिनीयर श्री. संकेत पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)