ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ब्रिटन मध्ये मंदी जाहीर ; ऋषी सूनक.

ब्रिटन मध्ये मंदी जाहीर ; ऋषी सूनक.

प्रकाशन: 18 Nov 2022 07:15 PM
वाचन संख्या 45

सरकारची घोषणा, आणीबाणीचा अर्थ संकल्प सादर.

शिरगांव | संतोष साळसकर :
एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटीश सरकार या मंदीचा मारा झेलण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने ५५०० कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे.
गुरुवारीच अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स २५ टक्क्यांवरून ३५ टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक जनरेटरवर 45 टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे. आता वार्षिक १.२५ लाख पौंड कमावणारे लोकही सर्वोच्च कराच्या कक्षेत येतील. तसेच २०२५ पासून इलेक्ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
संपूर्ण जग ऊर्जा आणि महागाईच्या संकटाचा सामना करत आहे. स्थैर्य, विकास आणि सार्वजनिक सेवा या योजनेमुळे आपण मंदीचा सामना करू शकू, असे हंट म्हणाले. ब्रिटनमध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारसह सर्वसामान्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात ११.१ टक्क्यांवर पोहोचला असून, ४१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. १९८१ नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर १०.१ टक्के होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स