ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा उद्योग केंद्र आणि अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी घेतली आमदार वैभव नाईक यांची भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा उद्योग केंद्र आणि अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी घेतली आमदार वैभव नाईक यांची भेट.

प्रकाशन: 14 Oct 2022 01:19 PM
वाचन संख्या 44

उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मुकेश मेश्राम व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्योजकांच्या समस्या व प्रश्नांबाबत चर्चा झाली. उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आढावा देखील आमदार वैभव नाईक यांनी यावेळी घेतला. तसेच कासी सूचना केल्या.
उद्योग केंद्राकडून बँकांकडे पाठविलेले प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. तरच नवउद्योजक जिल्ह्यात तयार होतील. त्यादृष्टीने उद्योग केंद्र व अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम केले पाहिजे. तसेच दर महिन्याला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर उपलब्ध झालेले प्रस्ताव मंजूर करावेत. नवउद्योजकांना मार्गदर्शन करावे. अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी केल्या. त्यावर मुकेश मेश्राम, श्रीपाद दामले यांनी सकारात्मकता दर्शवत सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स