ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांबूची शेती बहुउपयोगी तशीच फायदेशीर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

बांबूची शेती बहुउपयोगी तशीच फायदेशीर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

प्रकाशन: 03 Sep 2022 01:16 PM
वाचन संख्या 191

नाशिक | अजय सिंग : बदलत्या शेतीच्या उत्पादनांमध्ये बांबूची शेती बहुपयोगी असून ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनसोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, तहसीलदार अनिल दौंडे, कार्यक्रमाचे संयोजक आत्माराम दाते, दाते बांबू नर्सरीचे संचालक प्रशांत दाते आणि  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, कोरडवाहू नापीक जमिनीवर बांबूचे पीक घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेती करण्यासाठी पुढे यावे. दिवसेंदिवस बांबू चे महत्व वाढत आहे. आज बऱ्याच ठिकाणी प्लास्टीक ग्लास ऐवजी बांबूचा ग्लासचा उपयोग करण्यात येत आहे. पदार्थ बांबूच्या पानापासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. बांबूचे अनेक उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी बांबू शेती करुन त्यामध्ये नवनवीन प्रयोग राबवावे. नवनवीन प्रयोग राबवितांना शासन, सामाजिक संस्थांचा त्यामध्ये सहभाग घ्यावा, असेही यावेळी श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी 96 प्रकारच्या विविध बांबू प्रजाती असलेल्या नर्सरीची पाहणी  व बांबू पासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी केली. दाते परिवाराने बांबू नर्सरीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांचे यावेळी श्री.कोश्यारी यांनी कौतुक करुन अभिनदंन केले.
बांबू क्लस्टरचा विकास करावा असाही राज्यपालांनी व नरहरी झिरवाळ यांनी सल्ला दिला आहे.
बांबूची शेती अतिशय उपयोगी व फायदेशीर आहे. आदिवासी भागात बांबू शेतीचा अधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाच्या पारंपरिक मार्गदर्शक सूचना बदलणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात,जेणेकरुन बांबू क्लस्टरचा विकास करण्यात येईल, असे मत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स