ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मेजर कौस्तुभ रावराणे स्मृतीजागर कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मेजर कौस्तुभ रावराणे स्मृतीजागर कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती..!

प्रकाशन: 07 Aug 2022 04:42 PM
वाचन संख्या 54

आमदार राणे यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत केले अभिवादन..!

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी आयोजित स्मृतीजागर कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली. सडूरे येथील श्री रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात कौस्तुभ रावराणे यांच्या घरी प्रतिमा पूजनाने करण्यात आली. घर ते रवळनाथ मंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ व राणे प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मंदिरात माध्यमिक व प्राथमिक शाळांचे समूहगीत सादर करण्यात आले. त्याचबरोबर हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या बद्दल माहिती देण्यात आली. तसेच कोल्हापूर येथील शाहीर राजू राऊत यांनी शायरी पोवाडा सादर केला. यावेळी सर्व पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स