ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी..!

प्रकाशन: 07 Aug 2022 04:34 PM
वाचन संख्या 141

सडूरे येथे चौथ्या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीजागर संपन्न…!

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी अभिवादन व मानवंदना देण्यासाठी गावात नागरिकांनी मोठी गर्दी केली. आयोजित करण्यात आलेला स्मृतीजागर कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडला. या स्मृती जागरात शेकडो नगरीक व माजी सैनिक सहभागी झाले होते. भारत माता की.. जय, वंदे मातरम, अमर रहे.. अमर रहे.. कौस्तुभ राणे अमर रहे, अशा घोषणांनी खोरीतील गाव दणाणून सोडला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर कौस्तुभ राणे यांच्या सडूरे येथील घरी प्रतिमा पुजनाने करण्यात आली. कौस्तुभ राणे यांच्या आजी ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली.

कौस्तुभ राणे यांचे घर ते श्री रवळनाथ मंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सडूरे, अरुळे गावातील माध्यमिक व प्रथमिक शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत पटांगणावर आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीं परेड ने मेजर कौस्तुभ राणे यांना मानवंदना दिली. श्री देव रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वि.मं.करुळ गावठण , नाधवडे ब्राम्हणदव प्रशाला, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, अरुळे विद्यालय येथील मुलांनी देशभक्तीपर समुहगीत सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. शिरसाट यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवनपटावर उपस्थितांना माहिती दिले. सडूरे ग्रामपंचायत मधील कौस्तुभ रावराणे सभागृहाचे उद्घाटन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापुर येथील शाहीर राजू राऊत यांनी शाहीरी पोवाडा सादर करत देश सेवा करत हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी मंदिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स