ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ओरोस येथे सत्कार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ओरोस येथे सत्कार..!

प्रकाशन: 06 Aug 2022 10:21 AM
वाचन संख्या 94

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एकत्रित सत्कार करून चांगला उपक्रम संघटनेने राबविला आहे. भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास आपले सहकार्य लाभेल असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी ओरोस येथे केले.
महाराष्ट्र राज्य एच. एस. सी. व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा वतीने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय सिंधुदुर्ग येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पी. के. चौकेकर (सेवानिवृत्त लिपिक,  टोपीवाला हायस्कूल मालवण), सायमन फर्नांडिस (एस एम एस स्कूल कणकवली),  बाबुराव आरोलकर (सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिरोडा हायस्कूल) व लक्ष्मण आत्माराम पंडित (चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी) हे  शिक्षकेतर कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मसुरे तांत्रिक विद्यालय लिपिक तथा संघटना सचिव भानुदास परब यांनी केले. यावेळी संघटना अध्यक्ष मिलिंद जाधव, श्री डिसोझा सर, रमेश जाधव,श्री करंगुटकर यांनी शुभेच्छा दिल्या. मालवण येथील सेवानिवृत्त लिपिक श्री. पी. के. चौकेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या चांगल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी लिपिक श्री दशरथ सावंत, जाधव सर, श्रीकरंगुटकर,श्रीमती साक्षी धुरी, शंकर खंडवी, श्री धूमक, श्री त्वर, श्री मोर्जे, श्री दळवी, श्री पालयेकर, श्रीमती लंगडे, श्रीमती मनचेकर, श्रीमती शिंत्रे, श्रीमती पालव,श्रीमती वेंगुर्लेकर, नागेश कदम, चव्हाण आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स