ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईच्या अध्यक्षपदी हरिष परब यांची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईच्या अध्यक्षपदी हरिष परब यांची निवड.

प्रकाशन: 03 Aug 2022 06:29 PM
वाचन संख्या 102

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मुंबईस्थित “सिंधुदुर्ग सहकारी बँकेच्या”
सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली असून अध्यक्षपदी
देवगड मुटाट येथील श्री. हरिष बाळकृष्ण परब यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष श्री. जयवंत श्रीधर नरसाळे, संचालक श्री. दिवाकर रामचंद्र दळवी (सावंतवाडी), श्री. दिनकर हिरोजी तावडे (देवगड), तज्ञ संचालक श्री. शरदचंद्र सदानंद देसाई (सावंतवाडी), संचालक श्री. विलास जर्नादन परब (कुडाळ),श्री.श्रीकृष्ण दत्ताराम परब ( मसुरे -मालवण), श्री. चंद्रप्रकाश भैरुलाल जैन(मुंबई), श्री. संभाजी शिवाजी मंडले ( सांगली)
श्री. विजय बुधाजी नाईक(देवगड),श्री. स्वप्निक सुभाष फाटक(देवगड), श्रीमती प्रतिक्षा प्रमोद परब(कणकवली), सौ. पल्लवी अक्षय पंडित(मुंबई),तज्ञ संचालक (स्विकृत)


श्री. मोहन भास्कर तळेकर (देवगड),
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वसंत प्रभुदेसाई, सरव्यवस्थापक
श्री. सिताराम धुराजी धुरी(कुडाळ).
बँकेच्या लालबाग व बदलापूर येथे दोन शाखा आहेत.आपल्या जिल्ह्याची एकमेव बँक मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहोत. जिल्हयातील तमाम बांधवांनी आपल्या बॅकेकरिता भागभांडवल ठेवी, कर्ज, नवीन खाती वाढविण्यासाठी सहकार्य करावे.तसेच बँकेची नवीन शाखा सिंधुदुर्ग जिल्हयात उघडण्याचा संचालक मंडळाचा मनोदय असून त्यादृष्टीने लवकरच पाठ पुरावा करण्यात येईल अशी माहिती बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक दत्ताराम परब यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स