रानभाजी पाक कला स्पर्धेत पल्लवी चिंदरकर प्रथम..!
कट्टा परिसरातील ३० महिलांचा सहभाग.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाक कला
स्पर्धेत पल्लवी चिंदरकर (पेवाग्याच्या भाजीची वडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. माधवी वाईरकर (पेवग्याच्या भाजीचे वडे) व दीक्षा रेवडेकर (सुरनांच्या पानांची भाजी) यांनी संयुक्त द्वितीय क्रमांक तर साक्षी शंकरदास (टाकळ्याच्या वड्या), गीता नाईक (बांबूच्या कोंबांची भाजी), स्वाती पोखरणकर (चवईच्या फुलांचे कटलेट), समीक्षा हिर्लेकर (चवईच्या फुलांची भाजी) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला. चौथा क्रमांक स्मिता मेस्त्री (घोटवेल भाजी), संज्योत गोसावी (भारंगीची भाजी), सुविधा मलये (अळूची कुरकुरीत भजी), सोनिया हाडये (अळूची भाजी) यांनी संयुक्त मिळविला. तर सुरेखा सावंत, नीलम कदम, सायली नांदोसकर, सुप्रिया ढोलम, उज्वला गुराम, नेहा कदम, विजया वराडकर, वासंती हिर्लेकर, रेश्मा हिर्लेकर, साक्षी देसाई, अर्चना धुत्रे, सानिका गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.कट्टा परिसरातील ३० महिलांनी यात सहभाग घेतला होता.
या पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी विविध रानभाज्या पासून बनविलेले पदार्थ स्पर्धेला ठेवले होते. यात पेवग्याच्या भाजीची वडी, सुरणाच्या पानाची वडी, भारंगीची भाजी, अळूचे कटलेट, टाकळ्याच्या वड्या, अळूची भजी, चवईच्या फुलाचे कटलेट, कुरडईची भाजी असे विविध पदार्थ महिलानी बनवून आणले होते तसेच प्रत्येक पदार्थाची कृती लिहून आणली होती. यामुळे ही स्पर्धा अधिक रुचकर बनली.
या स्पर्धेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन आदिती शृंगारे व आरती वायंगणकर यानी केले. आरती वायंगणकर, मधुरा माडये व प्रियांका भोगटे यानी स्पर्धेचे परीक्षण केले. ओम गणेश साई मंगल होलचे मामा माडये यांनी आवश्यक टेबल व डेकोरेशन साहित्य पुरवले. या प्रदर्शनाला किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, शशी तांबट, सौ झाटये व परिसरातील महिलानी भेट दिली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)