ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड हायस्कुल परिसरात लोकवर्गणीतून झेंडू लागवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड हायस्कुल परिसरात लोकवर्गणीतून झेंडू लागवड..!

प्रकाशन: 28 Jul 2022 03:36 PM
वाचन संख्या 81

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मसुरे देऊळवाडा येथील ग्रामस्थांकडून मसुरे भरतगड हायस्कूल नं.२ च्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा समिती अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने लोकवर्गणीतून शाळा परिसरात पाच गुंठे जमीनीत पाचशे पेक्षा जास्त झेंडूच्या रोपांची लागवड करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
या लागवडीतून भविष्यात या रोपांपासून मिळणाऱ्या फुलांची विक्री करून त्यातून मिळालेले पैसे संस्थेला देणगी स्वरूपात देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर संकल्पना शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाकम व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक यांच्या संकल्पनेतून पुढे आली आणि ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आली आहे.
जमिनीच्या मशागतीपासून वाफे तयार करून पूर्ण लागवड होईपर्यंत विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे. त्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाकम, सदस्य सोनोपंत बागवे, विद्या लाकम, प्रभारी मुख्याध्यापक एस. आर. कांबळे, एस. एस. हळवे, सौ. एस. एस. मसुरेकर, सौ. ए. व्ही. कोदे, गणेश सावंत, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ यांनी श्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स