ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शासनाच्या उपक्रमांना सकारात्मक साथ देऊया ; सरपंच सुभाष लाड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शासनाच्या उपक्रमांना सकारात्मक साथ देऊया ; सरपंच सुभाष लाड.

प्रकाशन: 28 Jul 2022 04:14 PM
वाचन संख्या 25

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

शासनाच्या विविध उपक्रमांना साथ देतानाच कोविड लसीकरणा बाबत सर्वांनी सकारात्मकता दाखविण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी येथे केले. गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात
“विशेष ग्रामसभा” आयोजित करण्यात आली होती. यावेळी पं. स. मालवणचे तालुका कृषि अधिकारी संजय गोसावी, गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, श्री. शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. विभा परब, श्रीम. एकादशी गावडे, सौ. शिल्पा तेली, सौ. मेघा गावडे, ग्रामसेवक सौ. माधुरी कामतेकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीम. करुणा राणे, ग्रामरोजगारसेवक श्री. रामकृष्ण नाईक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जि. प. शाळा मुख्याध्यापक, उपशिक्षक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, बचत गट CRP, ग्रामसंघ पदाधिकारी तसेच गाव गोळवण, कुमामे व डिकवल येथील सुमारे १६४ ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेत घरोघरी तिरंगा, जलजीवन मिशन, कोविड लसीकरण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स