ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बैठक…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बैठक…!

प्रकाशन: 19 Jul 2022 10:15 AM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘ओडिएफ प्लस’ गांव जाहीर करणे या उपक्रमाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि. प. सिंधुदुर्गचे विनायक ठाकूर, तालुका कृषि अधिकारी पं. स. मालवण संजय गोसावी, गांव संपर्क अधिकारी श्रीम. स्नेहल गावडे तसेच पाणी व स्वच्छता कक्ष जि. प. सिंधुदुर्ग येथील तज्ञ मार्गदर्शक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास ग्रा. पं. गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य विरेश पवार, शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. विभा परब, सौ. मेघा गावडे, ग्रामसेवक श्रीम. माधुरी कामतेकर, ग्रा. पं. कर्मचारी, ग्रामरोजगारसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जि. प. शाळा मुख्याध्यापक, उपशिक्षक, आरोग्य सेवक-सेविका, बचत गट महिला तसेच गाव गोळवण, कुमामे व डिकवल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स