ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट यांचे निधन…..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट यांचे निधन…..!</em>

प्रकाशन: 17 Jul 2022 08:10 PM
वाचन संख्या 32

वैभववाडी | नवलराज काळे :
माध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट वय ५२ राहणार कोल्हापूर आर.के. नगर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. श्री भाट यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर या संस्थेत गेली वीस वर्षे ते कार्यरत होते. संस्थेतील कोल्हापूर, सडुरे, तिसंगी व करूळ या चारही शाखेत त्यांनी सेवा बजावली होती. काही महिन्यापूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स