ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या सहाय्याने दरडी हटविल्या..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या सहाय्याने दरडी हटविल्या..!</em>

प्रकाशन: 16 Jul 2022 12:19 PM
वाचन संख्या 48

वैभववाडी | नवलराज काळे :
करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक अडीज तास ठप्प झाली होती. संबंधित प्रशासनाने दोन जेसीबी च्या सहाय्याने दरडी बाजूला केल्या. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक रात्री 7.30 वाजता पूर्ववत झाली. दरम्यान या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती.
गेले चार काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला. घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. शुक्रवारी सायंकाळी घाटात दरड कोसळली. दरडीचा मोठा ढीग रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. घाट मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे व भुईबावडा मार्गे वळविण्यात आली. करुळ चेकपोस्टवर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ संबंधित प्रशासनाला कळविण्यात आले. तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घाटात धाव घेतली.
मार्ग बंद झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही वाहने करुळ चेकपोस्ट वरुन मागे फिरविण्यात आली. फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वाहतूक वळविण्यात आली. तर गगनबावडा येथे अवजड वाहने थांबवण्यात आली होती. दरड बाजूला करण्यासाठी घाटात दोन जेसीबी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने पडलेल्या सर्व दरडी बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर रात्री साडेसात नंतर वाहतूक पूर्ववत झाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स