ह्रदयापासून ह्रदयापर्यंत पोचते ते शिक्षण : फादर सॅवियो..
भान,मेहनत व शिस्त हे शिक्षणाचे महत्वाचे घटक..!
रोझरी इंग्लिश स्कूल मालवण येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात केले प्रतिपादन..
मालवण | नझीरा शेख़ :आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतींचा विचार करता नवीन पिढीतील शिक्षक कसा असावा या विषयावर रोझरी इंग्लिश स्कूल मालवण येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्विस यांचे मोलाचे सहकार्य लाभले . सदर प्रशिक्षणासाठी डॉन बॉस्को संस्था ओरसचे रेक्टर फादर पाॅल डिसोजा उपस्थित होते. तसेच डॉन बॉस्को ओरसचे मुख्याध्यापक फादर सॅवियो गोम्स उपस्थित होते . फादर पॉल यांनी 21 व्या शतकातील सकारात्मक शिक्षण कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण हे स्वतःच्या हृदयापासून मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे , तसेच शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या जवळ सहकारी वृत्ती असणे आवश्यक आहे असा संदेश त्यांनी दिला.फादर सॅवियो यांनी प्रशिक्षण स्वरूपी संवादात सांगितले की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देणे महत्त्वाचे नाही तर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मेहनत शिस्त इतर गुण अंगी जोपासणे आवश्यक आहे. तरच भविष्यात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ते मान मिळवू शकतात. शिक्षणाकडे एक व्यवसाय म्हणून न पाहता उद्याचे भविष्य आपल्या हातात आहे याचे भान राखणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर ओलविन गोन्साल्विस यांनी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)