ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडेत शैक्षणिक साहित्य वाटप..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदिवडेत शैक्षणिक साहित्य वाटप..!

प्रकाशन: 16 Jun 2022 06:48 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कोरोना साथी रोगामुळे बंद असलेल्या शाळा उघडत आहेत. मुलांना ऑनलाइन शिक्षणातून सुटका मिळणार आहे व प्रत्यक्ष शिक्षणाचा आनंद घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करून यश मिळवावे असे प्रतिपादन बांदिवडे येथील समाजसेवक व धान्य दुकान चालक हिरेश मुणगेकर यांनी येथे केले.

Article image


बांदिवडे केंद्र शाळा, बांदिवडे पालयेवाडी शाळा, बांदिवडे मळा वाडी शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच गुलाब पुष्प देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत व खाऊ वाटप बांदिवडे धान्य दुकान चालक हिरेश मुणगेकर यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उपसरपंच किरण पवार,शिक्षक संतोष आचरेकर , श्री. आकेरकर, जाधव, मारुती आचरेकर, श्री बुरुडे, अजय पडवळ, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी मुणगेकर यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स