वैभववाडी भाजपाची उद्या बैठक...!
वैभववाडी/नवलराज काळे :- वैभववाडी भाजपाच्या वतीने शुक्रवार दि. 17 जून रोजी पक्ष कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा भाजपा पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना बुथ सशक्तीकरण अभियानबाबत माहिती तसेच पक्षसंघटना वाढीबाबत माहिती देण्यात येणार आहे. तरी या बैठकीला जिल्हा परिषदनिहाय निवडण्यात आलेले नूतन प्रभारी, सर्व सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख व तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)