ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
बिळवसच्या श्री देवी सातेरी जलमंदिरचा जत्रोत्सव 22 जुलै रोजी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बिळवसच्या श्री देवी सातेरी जलमंदिरचा जत्रोत्सव 22 जुलै रोजी..!

प्रकाशन: 15 Jun 2022 07:41 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मालवण तालुक्यातील मसुरे बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील  वार्षिक जत्रोत्सव २२ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. दोन वर्षे कोरोना निर्बंध असल्याने सदर जत्रोत्सव गाव मर्यादित झाला होता. यावर्षी मात्र सर्व भक्तांना 
देवीचे दर्शन घेता येणार आहे.  जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे.  पावसाळ्यामध्ये होणारा हा एकमेव जत्रोत्सव असून मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवात उपस्थितीदर्शवतात.भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स