ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
दिक्षा तोंडवळकर हीचा माजी खा.निलेश राणेंकडून सत्कार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिक्षा तोंडवळकर हीचा माजी खा.निलेश राणेंकडून सत्कार..!

प्रकाशन: 15 Jun 2022 06:46 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

दिक्षा तोंडवळकर ही ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असून तिने बारावीच्या परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे.तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई किंवा पुणे येथे आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी वेरळ येथे केले.
बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून 96.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मालवण तालुक्यातील वेरळ येथील कु.दिक्षा सुमंत तोंडवळकर हीचा माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी वेरळ मुणगेकरवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.यावेळी निलेश राणे यांच्या समवेत माजी जि.प.बांधकाम सभापती अनिल कांदळकर ,जिल्हा बँक संचालक संदिप उर्फ बाबा परब,भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,माळगाव सरपंच निलेश खोत, भाजपा महिला कार्यकर्त्या पूजा वेरलकर, महेश मांजरेकर,दत्तराम आंबेरकर ,जितेंद्र परब, अनंत भोगले,रघुनाथ परब,धनंजय परब,अरविंद परब, भगवान परब, अशोक पोयरेकर, सचिन तोंडवळकर,रविंद्र पोयरेकर,समृद्धि तोंडवळकर, मनिषा कवठणकर , रेशमा पोयरेकर, विश्वनाथ भोगले, कु.दिक्षाचे वडील सुमंत तोंडवळकर व आई समीक्षा तोंडवळकर, ओंकार तोंडवळकर, पत्रकार अनिल तोंडवळकर व वेरळ गावातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तोंडवळकर परिवारातर्फे माजी खा.निलेश राणे यांचे औक्षण करण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.निलेश राणेंकडून कु.दिक्षा हीचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स