ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आडवली हायस्कुलला ५१ हजारांची मदत..!

आडवली हायस्कुलला ५१ हजारांची मदत..!

प्रकाशन: 03 Jun 2022 04:21 PM
वाचन संख्या 73

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित आर . ए. यादव हायस्कूल आडवली या प्रशालेतील सन १९७१ बॅचच्या सात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी शैक्षणिक मदत म्हणून ५१ हजार एक रुपये एवढी देणगी चेक द्वारे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई चे उपाध्यक्ष श्री. सुभाष साटम यांच्या कडे सुपूर्द केली . प्रशालेचे माजी विद्यार्थी व सर्वोदय एजुकेशन सोसायटी मुंबई चे सदस्य श्री प्रमोद बळीराम साटम व त्यांच्या बॅच मधील श्री. महादेव पांडुरंग हिर्लेकर , श्रीमती सुनंदा साटम ,श्रीमती छाया बाणावलीकर ,श्रीमती संजीवनी कुबल ,श्री व्ही. बी. परब ,श्री नरेंद्र साटम या सर्व माजी विद्यार्थांनी दिलेल्या या देणगी बद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष ,सदस्य,सर्व पदाधिकारी, अध्यक्ष शाळा समिती आडवली ,सदस्य, निमंत्रित सदस्य, सर्व समिती पदाधिकारी आडवली, प्रशालेचे मुख्याध्यापक ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स