लोरे नं-. २ दूधमवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीला यश...!
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर..
वैभववाडी |नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील दुधमवाडीकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला होता. सदर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांची होती. या मागणीला प्रतिसाद देत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन आ. नितेश राणे यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. लोरे गावात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर झाली आहेत.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, बुथ अध्यक्ष भरत मांजलकर, युवा कार्यकर्ते बंटी रावराणे, बाबू सावंत, अजय मांडवकर, अशोक वारिसे, अक्षय मांडवकर, अशोक सावंत, रत्नकांत मांडवकर, प्रकाश गवाणकर, सुभाष वारिसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)