<em>डॉ.डी.वाय पाटील साखर कारखान्यांत बँक प्रतिनिधी पदी संचालक दिलीप रावराणे यांची निवड…</em>
वैभववाडी/नवलराज काळे:-
गगनबावडा असळज येथील पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्यांमध्ये बँक प्रतिनिधी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांची निवड झाली आहे. निवडीनंतर आमदार नितेश राणे यांनी दिलीप रावराणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
तळकोकणातील संपूर्ण ऊस हा गेली अनेक वर्ष डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या कारखान्याला कर्ज पुरवठा केला आहे. जिल्हा बँकेत निवडून आलेल्या संचालकाची कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली जाते.
आमदार नितेश राणे यांनी कारखान्याच्या बँक प्रतिनिधी पदावर दिलीप रावराणे यांना संधी दिली आहे. निवडीनंतर दिलीप रावराणे यांचे ऊस उत्पादक शेतकरी तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)