कांदळगाव रामेश्वर वाचनालय इमारतीचा आज २७ रोजी लोकार्पण सोहळा..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कांदळगावचे सुपूत्र जी. एस. परब यांच्या विशेष प्रयत्नाने राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या (१५ लाख) खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या रामेश्वर वाचनालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा २७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत परिसर, कांदळगाव येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा उद्योजक दीपक परब, ओझर विद्यामंदिर, कांदळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, कांदळगाव सरपंच सौ उमदी परब उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष मधुसुदन परुळेकर, कार्यवाह प्रवीण पारकर यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)