ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>एडगांव तांबेवाडी पुलाचे उद्घाटन….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>एडगांव तांबेवाडी पुलाचे उद्घाटन….!</em>

प्रकाशन: 18 May 2022 01:43 PM
वाचन संख्या 178

माजी सरपंच व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य प्रमोद रावराणे यांच्या प्रयत्नांना यश ….

वैभववाडी | नवलराज काळे : अनेक वर्ष एडगाव तांबेवाडी येथे करूळ नदीवर पुल नसल्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत दळणवळणाची साकवा व्यतिरीक्त कोणतीही सोय नसल्यामुळे येथील ग्रामस्थ , विद्यार्थी व रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते . याबाबत अनेक वेळा ठराव, निवेदने, मोर्चा , आंदोलन करूनही शासनाने दुर्लक्ष केला .

एडगांवचे माजी सरपंच व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य श्री. प्रमोद रावराणे यांच्या अथक परिश्रमाने , व नियोजन बद्द सततच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ते रामेश्वरमंदीर – तांबेवाडी – पाष्टेवाडी ते करूळ – कुंभवडे अशा दोन गावांना भविष्यात जोडणारा हा पुल मंजुर होवून आज पूर्णत्वास आला आहे.

या पुलाचे उद्घाटन माजी सरपंच श्री प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते तर मा.सभापती श्री.जयेंद्र रावराणे , सरपंच सौ. रविना तांबे , सोसायटीचे चेअरमन , उद्योजक श्री सुनिल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

उद्घाटन प्रसंगी तांबेवाडी येथील स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स