माळगाव हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात..!
शाळेला मदत करत दिली गुरुदक्षिणा …
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मालवण तालुक्यातील ऍड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगाव या प्रशालेच्या १९९०-९१ बॅचच्या वतीने स्नेह संमेलन निमित्ताने तीन वर्गांचे लाकडी दरवाजे बसविण्यात आले. आजी माजी सर्व शिक्षक व प्रथम तीन क्रमांक प्राप्त पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.
तातू भोगले यांनी माजी विद्यार्थी संघ रजिस्टर्ड केल्याची माहिती दिली. उपाध्यक्ष महाजन मॅडम, खजिनदार महादेव सुर्वे, सदस्य अरुण भोगले , आदींनी मनोगत व्यक्त केले. हायस्कुलची इमारत दुरुस्त करण्यासाठी दहा लाख रुपयांची आवश्यकता असून माजी विद्यार्थी तसेच परिसरातील दात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी मनोगतात सांगितले. सर्वांनी शाळा दुरुस्तीसाठी एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन यावेळी सरपंच निलेश खोत यांनी केले.
दिपप्रज्वलन संस्था अध्यक्ष डॉक्टर संजय खोत, माजी मुख्याध्यापक केंद्रे सर, सरपंच निलेश खोत, मार्गी सर, आचरेकर मॅडम, तातू भोगले आदी उपस्थित होते.
संस्था सदस्य शशिकांत सरनाईक, हेमंत आडकर, शरद लाड, माजी मुख्याध्यापक केंद्रे सर, खोत सर, कुलकर्णी सर, पडेलकर सर, कदम मॅडम, शिंदे सर, नलावडे सर, माजी मुख्याध्यापक रमेश मार्गी, जोशी सर, मिसाळ सर, महाजन मॅडम, गिरी सर, बेनके सर, चव्हाण मॅडम,
१९९०-९१ बॅचचे माजी विद्यार्थी बापू राणे, शरद लाड, ज्योत्स्ना हाडकर, सीमा माळकर, सविता परब, अलका वंजारे, भारती परब, लक्ष्मण भोगले, संभाजी भोगले,राजेश भोगले, उमेश भोगले, श्याम परब, रवींद्र चव्हाण, सुनील कासले, स्वाती पडेलकर, माया माळकर, उमेश मुणगेकर, जेष्ठ नागरिक गोपाळ सरनाईक, पोलीस पाटील किशोर जाधव, प्रमोद परब आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर तर प्रास्ताविक आणि आभार उमेश मुणगेकर यांनी मानले
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)