श्री सातेरी जलमंदिर गाभाऱ्यावरील कलशाचा वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिराच्या गाभाऱ्यावरील कलशाचा वर्धापन दिन सोहळा शनिवार ०७ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी ९ ते १२ धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी
श्री सत्यनारायण महापूजा, आरती तिर्थप्रसाद, ७ ते ९ स्थानिक भजने , रात्री १० वाजता याक्षिणी दशावतार नाटयमंडळ
यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन
श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व बिळवस ग्रामस्थ यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)