मुणगे गावात कृषी प्रदर्शन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..!
दापोली कृषी विद्यापिठाशी संलग्न तज्ञ मार्गदर्शक आहेत विशेष आकर्षण...
मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : श्री देवी भगवती ग्राम विकास मंडळ, मुणगे आयोजित कृषी प्रदर्शन व मार्गदर्शन शिबिर ३ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न सर्व शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. विजयकुमार शेट्ये, डॉ. विलास सावंत,डॉ. केशव देसाई, डॉ. विजय दामोधर आदी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संचालक प्रा. संजय भावे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)