ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत आडवली हायस्कूलचे सुयश...!

तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत आडवली हायस्कूलचे सुयश...!

प्रकाशन: 25 Apr 2022 06:57 PM
वाचन संख्या 107

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधत गटशिक्षण कार्यालय,पंचायत
समिती मालवण तर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मोठा गटासाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरिता ‘भारतीय संविधान’ हा विषय ठेवण्यात आलेला होता.

या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
प्रशालेची विद्यार्थिनी कु.साक्षी विद्याधर तुळपुळे हिने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक तर कु.अनुष्का अनिल तांडेल या विद्यार्थिनींने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रशालेतून कु.साक्षी तुळपुळे हिने सहभाग नोंदविला होता.या वक्तृत्व स्पर्धेत साक्षीने प्रथम क्रमांक पटकावून सुयश संपादन केलेले आहे.तसेच
ती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे.तसेच तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कु.अनुष्का अनिल तांडेल हिने देखील द्वितीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे.वरील दोन्ही विद्यार्थिनीच्या सुयशाचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे.कु.साक्षी विद्याधर तुळपुळे व कु.अनुष्का अनिल तांडेल या विद्यार्थिनींना वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी प्रशालेचे सहा.शिक्षक श्री.एस.जी.झाडे सर यांनी मार्गदर्शन केले.
वरील विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष,सर्व संस्था पदाधिकारी,शाळा समिती सदस्य ,शाळा समिती पदाधिकारी,सदस्य,तसेच सर्व निमंत्रित ,आडवली प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स