ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>पावसाळ्यापूर्वी शेर्ले रस्त्याची डागडुजी न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा</em>…!

<em>पावसाळ्यापूर्वी शेर्ले रस्त्याची डागडुजी न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा</em>…!

प्रकाशन: 09 Apr 2022 02:53 PM
वाचन संख्या 172

बांदा | राकेश परब: शेर्ले झिरो पॉईंट ते तेरेखोल नदीपर्यंत जाणारा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महादेव धुरी यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ३६ ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन शेर्ले ग्रामपंचायतला दिले आहे.
श्री धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यालगत जीवन प्राधिकरण विभागाच्या पाईपलाईन खोदाईचे काम करण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. काही ठिकाणी भलेमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहतूक ही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जीवघेणा अपघात टाळण्यासाठी व रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करावा असे म्हटले आहे. अन्यथा १ मे रोजी आपण रस्त्यावर बसून उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 212

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स