ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदिनांक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदिनांक

प्रकाशन: 26 Mar 2022 07:51 AM
वाचन संख्या 32

२६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – . १५५२ साली ७३ वर्षीय गुरु अमरदास शीख धर्माचे तिसरे गुरु बनले.

सन १६६८ साली इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या मध्यमातून मुंबई प्रांतावर आपले अधिकार प्राप्त केले होते.

इ.स. १७८० साली ब्रिटीश वर्तमानपत्र ब्रीट गैजेट आणि संडे मॉनीटर यांचे प्रकाशण सर्वप्रथम रविवारच्या दिवशी करण्यात आले.सन १९०२ साली नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण केले.

इ.स. १९१० साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरवात केली.

सन १९४२ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्या सोबत आनंद भवन येथे पार पडला.

इ.स. १९७१ साली पाकिस्तान देशातून बांगलादेशाची विभागणी करण्यात आली आणि बांगलादेश स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करण्यात आलं

सन १९७२ साली भारताचे माजी राष्ट्रपती वी. वी. गिरी यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पहिल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे उद्घाटन केले.

इ.स. १९७३ साली लंडन स्टॉक एक्सचेंज ने २०० वर्ष जुने ऐतिहासिक नियम मोडीत काढत महिलांना पहिल्यांदाच नोकरीवर रुजू करून घेतले.

सन १९७४ साली झाडांची कत्तल थांबविण्यासाठी गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वात चिपको आंदोलन सुरु करण्यात आले.

इ.स. २००० साली रशियाच्या अध्यक्षपदी ब्लादिमीर पुतीन यांची निवड करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स