ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथे पत्रकार दिन साजरा..

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथे पत्रकार दिन साजरा..

प्रकाशन: 06 Jan 2022 11:31 PM
वाचन संख्या 32

बांदा | राकेश परब: पत्रकारिता ही लोकशाही संकल्पनेची जनक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही आव्हानात्मक असूनही समाजाभिमुख आहे. कोरोना कालावधीत मीडियाने महत्वाची भूमिका बजाविल्याने आपण या महामारीपासून सावध राहू शकलो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेली समाजाभिमुख व न्यायभिमुख पत्रकारिता आताच्या पत्रकारांनी पुढे न्यावी असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माडखोल येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथील सावंत फार्म येथे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री म्हात्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम वाडकर, माजी अध्यक्ष हेमंत खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन करून व बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्यात. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारांना वेगवेगळ्या समस्या जाणवत असतात. मात्र यावर मात करत जिल्ह्यातील पत्रकार काम करत आहे. येथील तळागाळातील समस्या व प्रश्न देखील पत्रकाराच्या माध्यमातून मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होतो.
यावेळी विश्राम सावंत, प्रमोद सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम वाडकर यांनी केले. स्वागत अनंत जाधव, रुपेश हिराप, निलेश मोरजकर, गुरुनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन कार्यवाह राकेश परब यांनी केले. आभार दिव्या वायंगणकर यांनी मानले.
यावेळी खजिनदार संदेश पाटील, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, विराज परब, शैलेश गवस, शैलेश मयेकर, मदन मुरकर, जयवंत मेस्त्री यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे समाज हीताचे कार्य पत्रकार करतात असेही ते म्हणाले.
तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले की, आपण मुंबई, ठाणे, रायगड येथे काम केले आहे, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम येथील पत्रकारितेत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज पत्रकार माध्यम क्षेत्राच्या पटलावर मांडत असतात, यासाठी येथील प्रशासकीय अधिकारी देखील आदरयुक्त भीती मनात ठेवून काम करत असतात.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स