ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेनेचे मालवण शहराध्यक्ष बाबी जोगींची सुदेश आचरेकरांवर टीका....!

शिवसेनेचे मालवण शहराध्यक्ष बाबी जोगींची सुदेश आचरेकरांवर टीका....!

प्रकाशन: 27 Nov 2021 01:55 PM
वाचन संख्या 162

प्रसिद्धिपत्रक तथा प्रेसनोटद्वारे केली टीका..

मालवण | प्रतिनिधी : शिवसेनेचे शहराध्यक्ष बाबी जोगी यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे विरोधकांचा आणि माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
श्री.सुदेश आचरेकर या व्यक्तीला जिल्ह्यात नावारूपास आणले तेच मुळी नारायण राणे यांनी आणि त्यांनी आजवर जेवढी पदे उपभोगली ती सगळी फक्त एका कुटुंबाची चाकरी केल्यामुळेच. बाकी त्यांच्या विषयी जनमत किती आहे हे वेळोवेळी मालवणातील सामान्य जनतेने दाखवून दिलेच आहे. ज्यांनी गरजेनुसार राणे नावाचा वापर स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी केला व गरज संपल्यानंतर व येणाऱ्या काळाची चाहूल लागल्याने कधी अपक्ष उभे राहून तर कधी पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करून राणेंना धोका दिला तेच आज राणे आमचे कुटुंबप्रमुख आहेत असे सांगत लोकांना भुलवत आहेत. दैवज्ञ भवन येथे जाहीर कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांच्यावर जाहीर मुक्ताफळे उजळणारे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हेच होते हे आचरेकर स्वतः विसरले असावेत असेच वाटते. मालवणचे नगराध्यक्ष महेशजी कांदळगावकर यांनी काय विकास केला आहे ते तुम्हाला सुध्दा माहीती आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत ते तुम्हाला सुध्दा दिसेल असा विश्वास बाबी जोगींनी व्यक्त केला आहे.
आचरेकर यांना राणे कुटुंबीय पूर्णपणे ओळखून आहेत आणि ते जाणून आहेत की ही व्यक्ती आता आपल्या काहीएक कामाची राहिली नाही. म्हणूनच प्रत्येक बाबतीत त्यांना डावलले जात आहे. याचमुळे वैफल्यग्रस्त झालेले आचरेकर प्रेस घेऊन स्वतः राणेंनी केलेले दावे खोडून काढताना आपण पाहत आहोत. शिवसेनेने नेहमीच हे सांगितले होते की बाळासाहेबांनी राणेंची उपद्रवमूल्ये ओळखून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, परंतु राणे स्वतः मात्र हा आरोप नाकारत आले आहेत व मी स्वतः पक्ष सोडला असे सांगत आले आहेत. परंतु कालच्या प्रेस मध्ये आचरेकर यांनी राणेंना बाळासाहेबांनी पक्षातून काढून टाकले होते अशी कबुली दिली आहे.
“सत्य परेशान हो सकता हैं , पराजित नहीं !” असेही बाबी जोगी यांनी सांगितले आहे. केवळ नगराध्यक्ष पदाचे तिकीट नाकारले म्हणून आपल्याच कुटुंबप्रमुखांविरोधात अपक्ष कुणी निवडणूक लढवली हे मालवणातील जनता विसरली नाहीये. मनात राग ठेऊन वेळोवेळी राणे कुटुंबियांच्या विरोधात मालवण मध्ये कुणी काम केले व त्यामागे काय अर्थकारण होते हेही मालवणवासीयांना ठाऊक आहेच. वेळ आणि काळ बघून आपले कुटुंबप्रमुख बदलणारे फक्त आपल्या जुन्या मालकाला खुश करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत आहेत हे न समाजण्याइतकी मालवण ची जनता दुधखुळी नक्कीच नाहीये. कारण जेव्हा यांची कामे अडतात तेव्हा हेच लोक आमदारांना स्वतःच्या कामांसाठी फोन लावतात ! तेव्हा कुटुंबप्रमुख आठवत नाही की ते आता दारात उभं करत नाहीत असा सवाल बाबी जोगी यांनी केला आहे.मालवण नगराध्यक्ष यानी कोविड़ कळ असूनही आणि तौक्ते वादळाचे संकट असूनही मालवण च्या विकासाची  कामे केली आहेत आणि जनता त्याची फोहोच पावती पण देत आहे.  पण स्पोर्ट्स काम्प्लेक्स येथील स्वीमिंग पुल,  बैडमिंटन हॉल याला विरोध करुन मालवण च्या क्रीड़ापटुंचे नुकसान केले त्यांच मूल्यमापन जनता नक्कीच करेल.  स्वतः च्या प्रभागतील 500 मीटर चा रस्ता गेली पाच वर्षे न केलेल्यांनी आमदारांवर तोंड सुख घेवु नए.  फक्त येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित तिकीट मिळवण्यासाठी राणे यांची मर्जी संपादन करण्याचा केविलवाणा प्रयन्त आचरेकर करत आहेत.  फक्त ही एकनिष्ठा येणाऱ्या निवडणुकीत टिकिट वाटपा नंतर किती राहते हे जनतेला आणि राणे कुटुंबीयांना दिसेलच.बाकी तुमच्या कुटुंबात लुडबुड करण्याची आम्हाला मुळीच हौस नाहीये, जे चाललंय ते असेच चालत राहो व तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राणे कुटुंबीयांचा प्रत्येक निवडणुकीत “कार्यक्रम” होत राहो हीच आमची मनोकामना. कारण राणे साहेब एक बोलतात आणि त्यांचेच कार्यकर्ते त्यांना खोटे पाडतात हे आता सर्वांना माहीत आहेच, परंतु त्याचबरोबर अशीच मुक्ताफळे  राणे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित असताना उधळावीत ही सदिच्छा. त्यासाठी व्यासपीठावर आपल्यासाठी एक खुर्ची राखून ठेवावी असे आपण राणेंच्या इतर निष्ठावान समर्थकांना आवाहन करत असल्याचे बाबी जोगी यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स