ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोस येथे १२ नोव्हेंबर रोजी शेतकरी, दूध उत्पादक संस्थांसाठी विशेष मार्गदर्शन मेळावा.....!

ओरोस येथे १२ नोव्हेंबर रोजी शेतकरी, दूध उत्पादक संस्थांसाठी विशेष मार्गदर्शन मेळावा.....!

प्रकाशन: 11 Nov 2021 12:49 PM
वाचन संख्या 126

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील करणार विशेष मार्गदर्शन..

भगिरथ प्रतिष्ठानचे डाॅक्टर प्रसाद देवधरही करणार मार्गदर्शन..
                     
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):  सिंधुदुर्ग जिल्हा बँक ,गोकुळ दूध संघ ,भगिरथ प्रतिष्ठान,समृध्दी डेअरी फार्म माडखोल या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दि १२ नोव्हेंबर रोजी माध्यमिक पतसंस्था ओरोस येथे दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
२ ऑक्टोबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्थांच्या प्रतिनिधींनि कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेला भेट दिली होती. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील तसेच गोकुळ दूध संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या समवेत दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने काय करता येईल, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ओरोस येथील माध्यमिक पतसंस्था सभागृह येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील तसेच भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर आमदार वैभव नाईक हे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या वाढीसाठी गोकुळ दूध संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रमाणे येथील दूध उत्पादन संस्थाना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच चांगल्या प्रतीची जनावरे पैदास करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात प्रतिवर्षी २० हजार लिटर दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना नवीन संकरित जातीची जनावरे खरेदी करण्यावर भर दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य राहणार आहे. ९० टक्के दुधाळ जनावरे ही जिल्ह्याबाहेरील चांगल्या जातीची खरेदी होतील या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या उद्दिष्ट प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिवर्षी २० हजार लिटर दूध उत्पादनात वाढ तसेच पुढील ५ वर्षात १ लाख लिटर दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या उद्दिष्ट प्रमाणे दूध उत्पादनात वाढ झाल्यास जिल्ह्यात १०० ते १२५ कोटीची प्रतिवर्षी उलाढाल होऊ शकते. त्यासाठी शेतकरी आणि दूध उत्पादक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्था व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम. के. गावडे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स