ताज्या बातम्या
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद,' ..तरी ही केस अपवादाच्या कक्षेतच.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद,' ..तरी ही केस अपवादाच्या कक्षेतच.....!

'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद,' ..तरी ही केस अपवादाच्या कक्षेतच.....!


कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात युक्तिवाद.


मालवणातील १६ पीडित व गुंतवणूक दारांच्या वतीने ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हेमेंद्र लक्ष्मण गोवेकर तसेच ॲड. तारिका चिंदरकर - कुबल यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत न्यायालयात बाजू मांडली. 



मालवण : येथील २४ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयीन कोठडी सुनावल्या नंतर कोल्हापूर येथील मुख्य आरोपी शुभम कृष्णांत देशमुख याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी या प्रकरणाबाबत सद्य स्थितीची माहिती देत माहितीची पुष्टी केली आहे. 


आरोपीच्या वतीने बाजू मांडताना 'आरोपीच्या वकिलांनी' आरोपी विरुद्ध सध्या तरी ठोस पुरावा नाही व आरोपीला या गुन्ह्यात खोट्या प्रकारे अडकवले असल्याचे सांगितले.  


फिर्यादीच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ ॲड. मराठे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सामान्य लोकांना कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. तसेच सदर आरोपी हा जामिनावर मुक्त झाल्यास परत अशा प्रकारचे गुन्हे करू शकतो त्यामुळे त्याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा. फिर्यादी यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ ॲड कौस्तुभ मराठे, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडली.


१६ गुंतवणूक दारांच्या वतीने बाजू मांडताना ॲड. श्रीराम चिंदरकर यांनी युक्तीवाद केला की, सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपी याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे. तसेच सदरचा आरोपी हा जे गुंतवणूकदार आपले पैसे परत मागायला येतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवतो. तसेच अशाच एका कोल्हापूर मधील प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील खोटे गुन्हे दाखल केले असून सदरच्या केस मधील फिर्यादीवर देखील कागल पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरच्या आरोपीला जामीन दिला तर तो अशाप्रकारे साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो त्यामुळे आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला जामीन देणे न्यायाच्या विरुद्ध होईल. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तत्त्वानुसार 'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद' जरी असेल तरी सदरची केस ही अपवादाच्याच कक्षेत येते त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज ना मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला.


माननीय न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकल्यानंतर पुढील प्रक्रिये साठी २९ ऑगस्ट २०२६ तारीख दिली असून पुढील निर्णय पुढच्या तारखेस होईल अशी माहिती ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी ...

07 Oct 2026 252

लोकप्रिय टॅग्स