घोटी येथे महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा त्र्यंबक पंडित यांनी नाभिक समाज बांधवांशी घेतली भेट.
घोटी येथे महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा त्र्यंबक पंडित यांनी नाभिक समाज बांधवांशी घेतली भेट.
समाज बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा.
ब्यूरो न्यूज | नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातल्या श्री संत सेना महाराज मंदिर सभागृह घोटी येथे गुरुवार, ०२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नाशिक शहर सचिव तथा महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा त्र्यंबक पंडित यांनी सहकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी नाभिक समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी श्री. विजय आप्पा पंडित यांनी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने जुलै महिन्यात आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याची रूपरेषा मांडली. हा ऐतिहासिक मेळावा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून, राज्यभरातील सलून कारागीर व व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते व नाभिक समाज ट्रस्ट, घोटीचे उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कडवे, ट्रस्ट अध्यक्ष श्री. एकनाथ कडवे, ज्येष्ठ नेते श्री. नारायण शिंदे, ट्रस्ट सचिव श्री. कांताभाऊ सूर्यवंशी, घोटी शहर युनियन अध्यक्ष श्री. वाल्मीक दादा रायकर, श्री. बिडवे, घोटी शहर उपाध्यक्ष श्री. रायकर, जिल्हाध्यक्ष श्री. देविदास बिडवे यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी श्री. ज्ञानेश्वर कडवे यांनी नाभिक समाजाच्या समस्या मांडल्या. तसेच श्री. नारायण शिंदे यांनी विजय आप्पा पंडित यांच्या कार्याची प्रशंसा करत इगतपुरी तालुका, संत सेना महाराज ट्रस्ट घोटी बुद्रुकच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. श्री. विजय आप्पा पंडित यांनी, सदैव समाजासाठी काम करणार असल्याचे वचन दिले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी घोटी शहर युनियनचे अध्यक्ष श्री. वाल्मीक रायकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सलून व्यावसायिकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)