ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
'शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून...'

'शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून...'

'शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून...'

Article image


तळवडे येथे कृषी विभागाकडून 'एअर इरिगेशन' तंत्रज्ञानाबाबत जनजागृती.


मसुरे | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील तळवडे येथे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कणकवली यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाऊस नसल्यामुळे भात व नाचणीची कोवळी रोपे व मोड आलेले बियाणे उन्हामुळे वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. 


या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी सांगितले की, पाऊस नसल्याच्या स्थितीत सर्वच शेतकऱ्यांना मोटरपंपाद्वारे रोपवाटिकांना पाणी देणे शक्य नसते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून त्यांनी त्यांच्या रोपवाटिकांना औषध फवारणीच्या पंपाद्वारे 'एअर इरिगेशन' (कृत्रिम तुषार पद्धती) करावे. कृषी विभागामार्फत या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवत सोपी पद्धत समजावून सांगण्यात आली.


औषध फवारणीच्या पंपामध्ये केवळ स्वच्छ पाणी भरून सूर्यास्तानंतर सायंकाळी पंपाचा नोझल उलटा धरून रोपवाटिका क्षेत्रावर पाण्याची फवारणी करावी. असे केल्यामुळे रोपवाटिका क्षेत्रावरील हवेतील आर्द्रता वाढते व रोपांची पाने हवेतील आर्द्रता शोषून घेऊन वाढतात व सुकून जात नाहीत. या पद्धतीचा वापर केल्याने हवेतील आर्द्रता वाढते, रोपांची वाढ चांगली होते आणि तीव्र उन्हातही रोपे सुकून जात नाहीत, असे उमाकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 


'आपली रोपवाटिका वाचवा, चांगले उत्पादन घ्या!' असा संदेश देत, ज्या शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकल्या आहेत त्यांनी या 'एअर इरिगेशन' तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून तळवडे येथील जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले. 


या कार्यक्रमाला कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, उप कृषी अधिकारी मृदुला प्रभु, सहाय्य्क कृषी अधिकारी दिलीप चव्हाण, सत्यवान तीवरेकर, मंगेश चाळके, नारायण कासले, विठोबा चव्हाण, सुनिधी चव्हाण, मनस्वी सुतार, अक्षय पालव तसेच कसवण - तळवडे परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स