मालवण नगरपरिषद वाॅर्ड क्र. ५ मध्ये शिवसेना उमेदवारांचा घरोघरी प्रचार.
मालवण नगरपरिषद वाॅर्ड क्र. ५ मध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार.
वाॅर्ड क्र ५ चे निवडणूक प्रभारी दादा साईल, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर, नंदीता वरवडेकर व पदाधिकारी आणि कार्यकर्तेउपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका साठी, वाॅर्ड क्र. ५ मध्ये कुमार काॅम्प्लेक्स आणि वाॅर्ड परिसरात घरोघरी जाऊन शिवसेना उमेदवारांचा प्रचार उत्साहात सुरू आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर व नंदिता वरवडेकर यांचा प्रचार करण्यात येत आहे.
जिल्हा सचिव व वाॅर्ड क्र ५ चे निवडणूक प्रभारी दादा साईल, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर, नंदीता वरवडेकर तसेच उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, बाबू हडकर, नितीन हडकर, नेहा हडकर, वैष्णवी कीर, गुरूनाथ सुकाळी, महेश परब, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तीनही निवडणूक प्रभारींसह उपस्थित सर्व प्रचारकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर आणि नगरसेवक पदांचे उमेदवार श्री विलास गणपत मुणगेकर व नंदीता वरवडेकर या शिवसेनेच्या उमेदवारांनी आणि उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनतेला घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन केले आणि विजयाची खात्री व्यक्त केली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)