ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार.

प्रकाशन: 12 Nov 2025 05:23 PM
वाचन संख्या 119

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार.


सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची माहिती.


मुंबई | ब्यूरो न्यूज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.


प्रस्तावित स्मारक ५ एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त २ एकर जागा शासनाने घेतली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावे, अशी सूचना केली होती. याबाबत त्यांची संकल्पना समजून घेण्यासाठी मंत्री ॲड. शेलार यांनी दालनात आज बैठक घेण्यात आली अशी माहिती मिळत आहे.


या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच माजी आमदार श्री.जठार यांनी मांडलेल्या आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवा, सुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या असे समजते आहे.


या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स