परतीच्या पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान...!
परतीच्या पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान...!
आमदार निलेश राणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार शेतकरी व बागायतदारांची परिस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : सतत सुरू असलेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मांडणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले अशी माहिती मिळत आहे.
कोकणात, पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
एका बाजूने पाऊस तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. भात पीक कुजून गेलं, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला, काही ठिकाणी धान्याच्या पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही परिस्थिती कळवणार आहे. भेटीसाठी वेळ ही मागणार आहे. कारण कोकणातल्या शेतीबद्दल आणि झालेल्या नुकसानीबद्दल जास्त काही मीडियावर येत नाही. पण आमचा सरकारवर विश्वास आहे की या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल, अशी भूमिका आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली असल्याची माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)