परब को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची तिसऱ्यांदा निवड.
परब को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची तिसऱ्यांदा निवड.
मसुरे | प्रतिनिधी : परब को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची ४४ वी वार्षिक सभा मुंबईत संपन्न झाली. या सभेत सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची सलग तिसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण, उर्फ दीपक परब होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री. अनिल परब, सचिव श्रीमती प्रतीक्षा परब, खजिनदार श्री. सोमा परब, माजी अध्यक्ष श्री. अशोक परब, परब मराठा समाज मुंबईचे सरचिटणीस श्री. जी. एस. परब तसेच बाल विकास व्यायाम मंदिर हॉलचे श्री. सत्यवान परब आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष निवडीसह नवीन संचालक मंडळ निवडण्यात आले. सभासद श्री. सुनील प्रभू यांनी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांचा शाल श्रीफळ सत्कार करत अभिनंदन केले. तसेच नवीन संचालक मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. यावेळी सौ राधिका परब, वैभववाडीहून श्री. शैलेंद्रकुमार परब, कांदळगावहून श्री. शैलेंद्र परब व श्री. गुरुदास परब तसेच वेंगुर्ल्याहून श्री. संजय परब सभेस उपस्थित होते. तसेच सभेला सोसायटीचे सभासद, निमंत्रित मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात.
कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्सा...