प्रा. हसन ख़ान यांचे सेट परीक्षेत यश.
प्रा. हसन ख़ान यांचे सेट परीक्षेत यश.
मालवण | ब्यूरो न्यूज : स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण चे प्रा. हसन ख़ान भूगोल विषयाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा आयोजित केली जाते.
१५ जून २०२५ रोजी ४० वी सेट परीक्षेचा घेण्यात आली होती.त्याचा निकाल दिनांक ३० ऑगस्ट रोजी लागला. १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या परीक्षेचा निकाल ६. ६९ टक्के लागला असून फक्त ६ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रा हसन खान हे पर्यावरण व भूगर्भ अभ्यासक असून करवंटी व बांबू पासून विविध वस्तू तयार करतात.यासाठी त्यांचा विकल्प हा ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. तसेच अनेक विषयांवर त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाबद्दल अनेक स्तरातून कौतुक होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)