ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 24 Aug 2025 10:10 PM
वाचन संख्या 389


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत तालुकास्तरीय घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी ही स्पर्धा मर्यादित असून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारणी सदस्य अमित खोत यांच्याकडे स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली.


स्पर्धेतील विजेत्या पाच स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.


तालुकास्तरीय स्पर्धा आयोजन बाबत मालवण तालुका पत्रकार समिती बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी गणेश मूर्ती व सजावटीचे फोटो स्पर्धा प्रमुख अमित खोत मोबा 9404457788 यांच्याशी संपर्क साधून ३० ऑगस्ट पूर्वी पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


अमित खोत, अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, छायाचित्रकार समीर म्हाडगुत ही पाच सदस्यीय परीक्षक टीम प्राप्त फोटो मधून तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करतील. त्यानंतर अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष बंटी केनवडेकर व स्पर्धा प्रमुख अमित खोत यांच्या वतीने अंतिम निकाल जाहीर केला जाईल. अशी माहिती पत्रकार समिती सहसचिव नितीन गावडे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 213

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स