कोसळलेल्या साकवाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा स्वखर्चातून पर्यायी मार्ग.
साकवासाठी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचा पुढाकार तर माजी सभापती सुनील घाडीगावकर यांचा पाठपुरावा.
ग्रामस्थांची कृतज्ञता.
मालवण | ब्यूरो न्यूज : तालुक्यातील शिरवंडे - दीपमाळवाडी येथील कोसळलेल्या साकवामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ मदत केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून नवीन साकव मंजूर झाला असून त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून पर्यायी मार्ग तयार केला आहे.
या साकवाच्या कोसळण्यामुळे येथील शेकडो ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी तातडीने नवीन साकवासाठी निधी मंजूर केला. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत नवीन साकवाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुढाकार घेतला. माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागली.
मागणीला प्रतिसाद देत तात्काळ उपाययोजना केल्याबद्दल, ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि माजी सभापती सुनील घाडीगावकर यांची कृतज्ञता व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)