आमदार निलेश राणे यांच्या चेंदवण बंधाऱ्याचं काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना.
कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी.
ब्यूरो न्यूज | कुडाळ :
चेंदवन खालची मळेवाडी व चेंदवण खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवन ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्या नुसार आमदार निलेश राणे पतन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या बंधाऱ्याच्या जागेची कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली. लवकरची याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, चेंदवन माजी सरपंच देवेंद्र नाईक, संदेश सुकळवाडकर यांच्यासह चेंदवण ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)