ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवणात नियोजन आढावा बैठक.

श्री गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवणात नियोजन आढावा बैठक.

प्रकाशन: 22 Aug 2025 08:17 PM
वाचन संख्या 65


मालवण | ब्यूरो न्यूज : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणातील सर्व प्रशासकीय विभागांची बैठक, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण दैवज्ञ भवन येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित व्यापारी, पदाधिकारी यांच्या सूचना जाणून घेत उपाययोजनां बाबत चर्चा करण्यात आली.


Article image


यावेळी सर्व प्रशासकीय विभाग, व्यापारी संघटना, सार्वजनिक गणेश मंडळ, शांतता मोहल्ला कमिटी, रिक्षा संघटना, राजकीय पदाधिकारी, नागरिक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करणे, बाजार व्यवस्थापन व बैठक व्यवस्था, मोठ्या वाहनांना सागरी महामार्गावर उभे राहण्याबाबत व्यवस्था, गणपती आगमन मार्ग गणपती विसर्जन मार्ग येथील व्यवस्था, शहरातील खड्डेमय रस्ते वरील खड्डे बुजवणे, रस्त्यांच्या बाजूची झाडी तोडणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच उपायोजना करण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स