रिक्षा चालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांचे श्रमदान.
बांदा | राकेश परब : बांदा पत्रादेवी रोडवर बांदेश्वर मंदिर ते लकरकोट दत्तमंदिर पर्यंत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले. ऐन गणेश चतुर्थी काळात या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या रोडवर गणेश चतुर्थी काळात मोठी वर्दळ असते. शेजारच्या गोवा राज्यातील लोक मार्केटसाठी बांदा बाजारपेठेत येत असतात याचा विचार करत येथील रिक्षा चालक संघटना यांनी पुढाकार घेत सदर खड्डे श्रमदानातून बुजवले. यासाठी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांचे विशेष सहकार्य लाभले.
जावेद खतिब यांनी त्यांची मालवाहक गाडी मोफत उपलब्ध करून दिली. या श्रमदानात सुनील माजगावकर, उल्हास शेवडे, अनिल माजगावकर, दाजी परब, दशरथ परब, योगेश सावंत मोर्ये, माजी उपसरपंच हर्षद कामत, अनिल म्हाडगूत, श्री गडेकर, श्री तारी सहभागी झाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)