अतिवृष्टीमुळे १९ ऑगस्टला शाळांना सुटी जाहीर.
ब्यूरो न्यूज | सिंधुदुर्ग नगरी :
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मान्यतेने ही सुटी जाहीर झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)